Posts

list of the Marathi Books worth reading

Image
 
  माणूस शाकाहारी का मांसाहारी ?  लेखन / संकलन   श्रीकांत काळे  संजय जोशी  आता पाश्चिमात्य जगात vegan food ची फॅशन जरी आली असली असली तरी शाकाहारी  जीवन पद्धती आपल्याकडे पूर्वापारपासूनच  होती!  शाकाहारी जीवनपद्धतीवर असा कोणता सूक्ष्म विचार आमच्या  पूर्वजांनी  हजारो वर्षांपूर्वी केला होता की ज्याचा मला अभिमान वाटायला पाहिजे?  0१. जगात दोन प्रकारचे प्राणी असतात एक अंडज ( जे अंड्यातून बाहेर येतात )आणि दुसरे सस्तन (दुधासाठी स्तन असलेले ). या दोन्ही प्राण्यांमध्ये पाणी कसे प्यायले जाते यावरून तो शाकाहारी आहे की मांसाहारी हे आमच्या शास्त्राने ठरवले.जे प्राणी पाणी ओठांनी खेचून पितात ते सर्व शाकाहारी आहेत. उदाहरणार्थ गाय, म्हैस, हत्ती इ. परंतु जे प्राणी  जीभ बाहेर काढून लपलप करत पाणी चाटून पितात ते सर्व प्राणी मांसाहारी असतात. उदाहरणार्थ मांजर, वाघ, कुत्रा. यावरून आपल्याला समजेल की माणूस पाणी हे ओठांनी शोषून पितो. चाटून नाही. खेचून किंवा ओढून पितो म्हणून माणूस निसर्गतः शाकाहारी प्राणी आहे.  ०२. खूप लोक असा प्रश्न विचारतात की जीव तर ...

भारताच्या dark age किंवा पारतंत्र्याची सुरुवात कधी आणि कशी *झाली ?

 भारताच्या dark age किंवा पारतंत्र्याची सुरुवात कधी आणि कशी *झाली ? लेखन/संकलन   *श्रीकांत काळे  संजय जोशी*    भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले हे आम्हाला शिकवले जाते परंतु आम्ही पारतंत्र्यात कधी गेलो आम्हाला कधीच सांगितले जात नाही. कारण ते गुंतागुंतीची आहे. एकच तारीख  किंवा कालखंड सर्व भारताला लागू नाही.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही पारतंत्र्यात का गेलो ? आमचे काय कमी पडले ? हे आम्हाला कधीच इतिहासामध्ये शिकवले जात नाही.  खरं तर हेच खूप महत्वाचे आहे. १८५७ नंतर स्वातंत्र्य कसे मिळवले एवढेच फक्त सांगितले जाते, ते देखील सोयीने! असो या दुर्दैवी कालखंडाची सुरुवात सिंध पासून झाली जो आज पाकिस्तानचा भाग आहे.  भारतावर पहिले अरब इस्लामिक आक्रमण इसवीसन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम ने केले. इस्लामच्या खलिफा ने सिरिया, दमास्कस मधून  हिंदुस्तान वर स्वारी करायला महमंद बिन कासिम वय फक्त १८ ते २० वर्षे, ह्याला पाठवले. आज पाकिस्तानचा भाग असलेल्या सिंध प्रांतावर  मोहम्मद बिन कासिम ने स्वारी केली तेव्हा सिंध चां शेवटचा हिंदू  र...
 शेर सिंह राणा ची अद्भूत *सत्यकथा........श्रीकांत* काळे  फूलनदेवी नावाची कुप्रसिद्ध डाकू, तिने बहमाई नावाच्या गावांमध्ये 26 लोकांचे हत्याकांड केले, त्याच्यामध्ये महिला आणि लहान मुले यांचापण समावेश होता. पुढे ती मध्य प्रदेश सरकारला शरण गेली आणि नंतर पुढे राजकारणात येऊन  खासदार झाली.  त्यानंतर  26 जुलै 2001 मध्ये तिला गोळ्या घालण्यात आल्या आणि तिचा त्यामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी शेर सिंह राणा उर्फ पंकज सिंग नावाच्या  व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.  4 फेब्रुवारी 2004 रोजी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दिल्लीच्या तिहार जेलमधून या शेर सिंह राणा ने अतिशय नाट्यमयरीत्या पलायन केले. हरिद्वारजवळ रुरकी नावाचं गाव आहे तिथला हा शेर सिंह राणा होता.  आजोबांची  42309 एकर जमीन होती परंतु कायद्यामुळे  वडिलांकडे त्यातली  केवळ 185 एकरच उरली होती. शेर सिंह राणाने जेलमधून पलायन केले  तेही एखाद्या चित्रपटाची कथा असावी अशा पद्धतीने. ज्या दिवशी त्याला विविध कारणांसाठी कोर्टात हजर व्हायचं होतं तेव्हाच त्यांनी आपल्या दोन साथीदारांना पोलिसांच्या वेशा...
 28 मे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म दिवस. स्वातंत्र्यवीर  सावरकर यांना 1910 मधे जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेचा कालावधी होता पन्नास वर्षे  आणि त्या वेळेस त्याचे वय होते अवघे २७ वर्षांचे!  अंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगल्यानंतर  सावरकरांनी त्यासंदर्भात माझी जन्मठेप हे आत्मचरित्र लिहिले आहे. हे आत्मचरित्र वाचताना त्यांचे झालेले हाल आणि त्यांच्यावर केलेले अमानुष अत्याचार वाचून अंगावर अक्षरशः काटा येतो!  त्यानुसार, सूर्यास्ताला  कैद्यांना एकदा का कोठडीमध्ये बंद केले की पुढील बारा तास शौचास वा लघवीला जाण्यासाठीदेखील  मनाई होती! आणि जर कैद्याला  हे पाळणे शक्य झाले नाही तर  दुसऱ्या दिवशी तो मल त्याला स्वतःच्या हाताने काढावा लागे! शिवाय त्याबद्दल  मारहाणही होई, ती वेगळीच! शिव्या देत, अपमान करत, कधीकधी पूर्ण तीन-चार दिवस बेड्या घातलेल्या अवस्थेत राहण्याची शिक्षा दिली जाई! ही अमानुष पद्धत बंद व्हावी यासाठी  अगदी गृहमंत्र्यांपर्यंत  तक्रारअर्ज  करावे लागले!  जेवणाच्या बाबतीतही अत्याचार होत ह...