भारताच्या dark age किंवा पारतंत्र्याची सुरुवात कधी आणि कशी *झाली ?

 भारताच्या dark age किंवा पारतंत्र्याची सुरुवात कधी आणि कशी *झाली ?

लेखन/संकलन 

 *श्रीकांत काळे

 संजय जोशी* 

 

भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले हे आम्हाला शिकवले जाते परंतु आम्ही पारतंत्र्यात कधी गेलो आम्हाला कधीच सांगितले जात नाही. कारण ते गुंतागुंतीची आहे. एकच तारीख  किंवा कालखंड सर्व भारताला लागू नाही.

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही पारतंत्र्यात का गेलो ? आमचे काय कमी पडले ? हे आम्हाला कधीच इतिहासामध्ये शिकवले जात नाही.  खरं तर हेच खूप महत्वाचे आहे.


१८५७ नंतर स्वातंत्र्य कसे मिळवले एवढेच फक्त सांगितले जाते, ते देखील सोयीने! असो या दुर्दैवी कालखंडाची सुरुवात सिंध पासून झाली जो आज पाकिस्तानचा भाग आहे.


 भारतावर पहिले अरब इस्लामिक आक्रमण इसवीसन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम ने केले. इस्लामच्या खलिफा ने सिरिया, दमास्कस मधून  हिंदुस्तान वर स्वारी करायला महमंद बिन कासिम वय फक्त १८ ते २० वर्षे, ह्याला पाठवले. आज पाकिस्तानचा भाग असलेल्या सिंध प्रांतावर 

मोहम्मद बिन कासिम ने स्वारी केली तेव्हा सिंध चां शेवटचा हिंदू  राजा दाहीर होता. त्याला एक मुलगा आणि  दोन मुली होत्या. एका मुलीचे नाव होते सुमित्रा आणि दुसरीचे सुशीला. अनेक वर्षे आक्रमण न झाल्यामुळे  आणि काही स्थानिक लोकांनी गद्दारी केल्यामुळे राजा दाहीर ह्या आक्रमणाचा यशस्वी मुकाबला करू शकला नाही. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने स्वतःला अग्नीमध्ये झोकून दिले. हा भारतातला पहिला जोहार. अनेक कत्तली झाल्या. अनेक मंदिरांचे नुकसान झाले. मंदिरात गाई कापल्या गेल्या. शेकडो महिलांना अरबस्तानात विकण्यासाठी पकडले गेले. दाहीरच्या दोन्ही मुलींना मोहम्मद बिन कासिम ह्याच्या सैन्याने पकडले आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांनी  एक मुलगी स्वतःला ठेवायची आणि एक दमस्कस ,सिरिया

मधील असलेल्या त्यांच्या खलिफा ला भेट द्यायची असे ठरवले की जेणेकरून त्या मुलीला तो कायमस्वरूपी आपल्या जनानखान्यात ठेवू शकेल. मात्र पहिल्या मुलीवर- सुमित्रावर बळजबरी करण्याच्या नादात तिनेच स्वतःला चाकूने भोसकून घेऊन संपवून टाकले. दुसर्‍या मुलीला - सुशीलाला  घेऊन ते दमास्कस सिरीया खलिफा ला भेट देण्यासाठी घेऊन गेले.  सुशीला खलीफाकडे गेली तेव्हा तिने त्याला खोटेच सांगितले की मी आता तुझ्या जोगी आता राहिलेली नाही, कारण यापूर्वीच मला मोहम्मद बिन कासिम ह्याने उपभोगले आहे! ह्या गोष्टीचा भयंकर राग येऊन खलिफा ने   महमद बिन कासिम ला पोत्यात घालून त्याच्यासमोर हजार करायची आज्ञा केली. त्यानुसार खलिफाच्या सैनिकांनी त्याला पकडून आणले आणि तोफेच्या तोंडी देऊन मारले.


अशा पद्धतीने पहिल्याच क्रूर आक्रमकाला एका  राजकन्येने आपल्या बुद्धीच्या जोरावर, शस्त्राशिवाय संपवले.  अर्थात  जेव्हा खलिफाला सत्य  समजले  तेव्हा त्याने सुशीलालासुद्धा भिंतीमध्ये चिरून मारून टाकले! 


आपल्या देशावरील किंवा धर्मावरील पहिल्या अरब मुस्लिम आक्रमणाची ही  मन व्यथित करणारी कथा! 


इराण सारखे अनेक देश तीस ते पस्तीस वर्षात पूर्ण इस्लामी झाले आणि आजतागायत ते इस्लामीच आहेत.  आमच्याकडे फक्त गंगा ओलांडायलाच  त्यांना सुमारे पाचशे वर्षे लागली! ही घटना घडली नसती तर कदाचित पन्नास वर्षातच ह्या आक्रमकांनी गंगा ओलांडली असती आणि भारताचा पुरता विध्वंस केला असता! 


या परकीय आक्रमकाच्या नावावरूनच आज पाकिस्तानने  सर्वात मोठ्या बंदराचे नाव सुद्धा पोर्ट कासिम ठेवले आहे! 


आज किती भारतीय तरुण-तरुणींना राजा दाहीर याच्या तेजस्वी सिंधी मुलींबद्दल ही कथा माहीत आहे ? 


ज्या कारणासाठी छत्रपती संभाजी ही मालिका बंद करण्यात आली असावी, त्याच कारणासाठी इतिहासातून हा आणि असे असंख्य उल्लेख पूर्वीच वगळण्यात आले असावेत! जय सेक्युलरॅरिझम!! मेरा भारत महान!!! 


मुख्य संदर्भ 

स्वामी वरदानंद भारती लिखीत  श्रीराजा दाहिर

Comments

Popular posts from this blog