माणूस शाकाहारी का मांसाहारी ? 

लेखन / संकलन

 श्रीकांत काळे 

संजय जोशी 


आता पाश्चिमात्य जगात vegan food ची फॅशन जरी आली असली असली तरी शाकाहारी  जीवन पद्धती आपल्याकडे पूर्वापारपासूनच  होती! 


शाकाहारी जीवनपद्धतीवर असा कोणता सूक्ष्म विचार आमच्या  पूर्वजांनी  हजारो वर्षांपूर्वी केला होता की ज्याचा मला अभिमान वाटायला पाहिजे? 


0१. जगात दोन प्रकारचे प्राणी असतात एक अंडज ( जे अंड्यातून बाहेर येतात )आणि दुसरे सस्तन (दुधासाठी स्तन असलेले ).

या दोन्ही प्राण्यांमध्ये पाणी कसे प्यायले जाते यावरून तो शाकाहारी आहे की मांसाहारी हे आमच्या शास्त्राने ठरवले.जे प्राणी पाणी ओठांनी खेचून पितात ते सर्व शाकाहारी आहेत. उदाहरणार्थ गाय, म्हैस, हत्ती इ. परंतु जे प्राणी  जीभ बाहेर काढून लपलप करत पाणी चाटून पितात ते सर्व प्राणी मांसाहारी असतात. उदाहरणार्थ मांजर, वाघ, कुत्रा. यावरून आपल्याला समजेल की माणूस पाणी हे ओठांनी शोषून पितो. चाटून नाही. खेचून किंवा ओढून पितो म्हणून माणूस निसर्गतः शाकाहारी प्राणी आहे. 


०२. खूप लोक असा प्रश्न विचारतात की जीव तर आंब्यामध्ये * पण आहे* , *पालेभाजीतही आहे , तरी आपण ते  का खातो ? याचे उत्तर असे आहे की जिथे त्यांचे जीवन पूर्ण होते, तिथे मी ते खातो म्हणून ती हिंसा असली तरी ती अपरिहार्य क्षम्य हिंसा आहे. 

 मी आंबा खाल्ला नाही किंवा पालकाची भाजी खाल्ली नाही तरी काय होणार ? ते सडून जाणार, खराब होणार. म्हणून भाजी आंबा हे सजीव पदार्थ असले तरी सुद्धा त्यांंची वाढ पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याचे जीवन संपल्यानंतर मी ते ग्रहण करून त्यातून माझं जीवन उभे करतो, म्हणून त्यात गैर नाही.


०३.   दुसरे असे की जे जे प्राणी निसर्गतः मांसाहारी आहेत ते सर्व प्राणी शस्त्र अग्नी किंवा मसाला यांचा वापर न करता त्या प्राण्याला खातात. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की जो अग्नी, शस्त्र आणि मसाल्याचा वापर करून मांसाहार करतो.  हे माणूस निसर्गतः मांसाहारी नसल्याचेच लक्षण आहे. 


०४. माझ्याकडे शस्त्र नसेल, शक्ती नसेल आणि जर मला कोणी शस्त्र आणि शक्तीच्या आधारे लुबाडले किंवा जीवे मारले तर ते अन्याय्य ठरते. याच न्यायाने मुक्या प्राण्याकडे शक्ती किंवा शास्त्र नसताना मी त्याचा जीव घेणे  कितपत न्याय्य आहे ? . बकरी ची मान चिरताना तिच्या डोळ्यात दिसणारे कारुण्य आणि भीतीचे भाव स्पष्टपणे दिसत असतानाही निर्दयपणे तिला मारणे किंवा मारवणे हे  सुसंस्कृत माणसाचे लक्षण ठरत नाही. म्हणूनच  मांसाहार हा माणसासाठी त्याज्यच आहे. 


०५.  काही लोक म्हणतात की आम्ही सुधारलो आहोत म्हणून आम्ही मांसाहार करतो परंतु हे तत्त्वतः अतिशय चुकीचे आहे कारण जेव्हा शेतीचा शोध लागला नव्हता तेव्हा कदाचित आमच्या पूर्वजांनी मांसाहार केला असेल तर एकवेळ क्षम्य समजले जाईल परंतु आज जेव्हा शेतीचा शोध लागलेला आहे, शेतीमध्ये प्रचंड अन्नधान्याचे उत्पादन येत आहे असे असताना निष्पाप प्राण्याला मारून आपल्या पोटाचे कब्रस्तान करण्यात काय अर्थ आहे ?  शेतीच्या प्रगत अवस्थेतही मांसाहार करत राहणे हे पुढारलेले नव्हे तर मागासलेले असल्याचे लक्षण आहे. आज मांसाहारी माणसाला, शेतीचा शोध लागला तरीही तू अजूनही मांसाहार  का करतोस ? असे विचारायला हवे. आजही मांसाहार करणे हे जंगली आणि रानटी माणसाचे लक्षण आहे. 


०६. खूप जण असे समजतात की मांसाहार केल्याने शक्ती मिळते परंतु हे धादांत असत्य आहे. प्राण्यांमध्ये सर्वात जास्त शक्ती ही हत्ती मध्ये असते. घोडाही शक्तीशाली असतो. हे दोन्हीही ताकदवान प्राणी शाकाहारी  आहेत.  म्हणूनच आज यंत्राची शक्तीसुद्धा Horse Power HP मधे मोजली जाते. पूर्वी अश्वशक्ती आणि गजशक्ती ही  मोजायची परिमाणे मानली जात . कुत्रे मांसाहारी असूनही  ते शक्तीमान समजले जात नाही. म्हणजेच मांसाहारी तो शक्तीमान हे काही निर्विवाद तत्त्व होऊ शकत नाही. 


०७. अनुष्का शर्मा मुळे विराट कोहली सुद्धा शुद्ध शाकाहारी झाला आणि तरीही त्याच्या परफॉर्मन्सवर काही वाईट परिणाम झाला नाही हे तर अलिकडच्या काळातले ढळढळीत उदाहरण आहे. 


०८.  काही जण प्रश्न विचारतात दूधपण प्राणीजन्य आहे आणि अंडे सुद्धा प्राणीजन्य आहे तरीसुद्धा आमचे शास्त्र गाईच्या दुधाला शाकाहारी आणि अंड्यालामात्र  मांसाहारी मानते,असे का ?  याबाबत आपले शास्त्र सांगते की अंडे हे वासनेतून निर्माण होते तर दूध हे वासरा बद्दलच्या वासल्या तून  निर्माण होते. त्यामुळे दोन्ही जरी प्राणिजन्य असले तरीही त्यांत हा महत्त्वाचा फरक आहे. 

आमच्या पूर्वजांनी सखोल अभ्यास आणि प्रयोग करून एकदा निर्णय दिला की तो स्वीकारण्याची आपल्यामध्ये सभ्यता असली पाहिजे. एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तर भले आपल्याला तो मान्य असो वा नसो, आपल्याला तो मान्य करावाच लागतो. तीच सभ्यता  आपल्यामध्ये पूर्वजांचे अभ्यासपूर्ण निर्णय स्वीकारण्यातही  हवी. परंपरेबद्दल प्रेम हवे. एखादी गोष्ट  ऋषींनी सांगितली असेल तर  ती गोष्ट मान्य करायला पाहिजे. कारण या परंपरा देण्यामागे ऋषींचा कोणताही स्वार्थ नव्हता तर सृष्टीबद्दलची आत्यंतिक कळकळ होती. योग्य परंपरेचा नाश करणाऱ्यांचा धर्म कधीच टिकत नाही. 


०९. माणसाचे दात, लाळ, आतडी हे  मांसाहारासाठी योग्य नाही तरीसुद्धा आपण शरीरावर अत्याचार करून मांसाहार करत असतो आणि परिणामी शरीरे बिघडवत असतो. 


१०. फक्त शाकाहारी प्राण्यालाच घाम येतो, जसे माणूस, गाय, हत्ती. याच न्यायाने  माणूस हा शाकाहारी ठरतो. 


११. बकरी मध्ये किंवा कोंबडी मध्ये एक किलो मांस तयार होण्यासाठी तिला कित्येक किलो गवत किंवा शाकाहार खावा लागतो यामुळे निसर्गाचे नुकसान होते. अर्थात खाण्यासाठी बकरे किंवा कोंबडी वाढवण्यामुळे अप्रत्यक्षपणे निसर्गाचीच हानी होत असते. 


१२. शेवटी काय तर आम्हाला काय खायचे ह्याचे स्वातंत्र्य जरूर आहे, हवे तर मांसाहारी खा, पण त्याचे परिणाम भोगायला तयार रहा हेच कर्माचा सिद्धांत आम्हाला सांगतो. जे पेराल तसेच उगवणार. 


१३. खूप जण शाकाहार ही फक्त ब्राह्मण आणि जैन यांचीच जबाबदारी समजतात किंवा हे फक्त यांनाच लागू आहे असे समजतात. खरंतर कुठलाही माणूस हा शाकाहारी असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. 

ब्राह्मणाने कुठल्याही परिस्थितीत मांसाहार करूच नये आणि त्याने समाजासमोर एक उदाहरण निर्माण करावे म्हणजे बाकी समाज सुद्धा शाकाहारी होईल ही अपेक्षा होती आणि आहे. आज ब्राह्मण त्यांची ही जबाबदारी समजत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.


१४. जसा आहार तसे मन जन बनते. मांसाहारी माणसे शाकाहारींपेक्षा मनाने क्रूर असण्यामागे हे महत्त्वाचे कारण आहे.

Comments

Popular posts from this blog